मन माझे

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मन माझे

kiran Kshirsagar

     मन माझे

मन माझे स्वैर भारी
घेते स्वछंद भरारी
हटकते कुणी जरी
त्याच्या लागते जिव्हारी.

मन माझे हळवे किती
जपते भावुक नाती
भटकते दुर किती
शब्द त्याचे गीत होती.

मन माझे राग धरी
हरवता अनुराग वरी
लटकते पुन्हा माघारी
बरसवण्या प्रेम सरी.

मन माझे जोडी जिव्हाळा
येता त्याला कळवळा
अटकते जीवन कळा
सोसते आणिक दुख:च्या झळा.

मन माझे होते कटु
कुणी भांडता लुटु-पुटु
फटकते होवुन धटु
म्हणे अलगद पापण्या मिटु.

मन माझे बंड पुकारी
होता नाहक भिकारी
खटकते त्याला सारी
कुणाची उगा लाचारी.

मन माझे करी दंगा
पाहुनिया नाच नंगा
सटकते चारी अंगा
रोखण्यास नित ढोंगा.

मन माझे मोर पिसारा
पित असते रान-वारा
विस्कटते भर-भरा
भव्य त्याचा डोलारा.

    किरण क्षीरसागर.