आदर्श

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आदर्श

kiran Kshirsagar
   आदर्श

  रित जगाची इथे
  पटत नाही मनाला
  स्वतःस पाहिजे तसे
  बदलुन घेती तत्वाला
  मी जपतो आदर्शाला
  नुकसान सोसून स्वतःला
  अन ठरतो इतरांसाठी
  मी माझ्याशी एकलकोंडा
  ज्याने त्याने आप-आपले
  बदलुन घेतले तत्व
  मीही बदलावे म्हणुनी
  सोडावया संगती स्वत्व
  लाभो खुशाल तुम्हाला
  या बदलांचे फळ
  सोसत राहीन मी मनाशी
  या वेदनेची कळ
  अंतर्मुख होऊन स्वतःशी
  ना देतो दोष कुणाला
  व्यथा माझ्या अंतरिची
  का सांगु उगाच कुणाला
               किरण क्षीरसागर .