निष्ठा ..... किरण क्षीरसागर

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

निष्ठा ..... किरण क्षीरसागर

kiran Kshirsagar
        निष्ठा

    मी आत्ममग्न असतांना
    का खंत तुम्हाला त्याची
    मी तुमच्यासोबत नसतांना
    नका बाळगू भ्रांत उद्याची.

    तुम्ही उपभोगा सुखे सारी
    अन आयुष्य जगा मजेने
    मी माझी  इतिकर्तव्ये सारी
    पार पाडत जाईन निष्ठेने.

   मी राहतो जरी आत्ममग्न
   तरी विसरत नाही काही
   मी सोबत नसलो तुमच्या
   तरी असतील माझ्या खुणाही.

   दिसतील त्या खुणांतून
   मार्ग पुढेच जाण्याचे
   हवे ते मिळवून त्यातून
   समजा तेच तुम्हा भाग्याचे.

    भुरळ कधीच पडत नाही
    मला क्षणिक सुखांची
    दूर दृष्टी माझी पाही
    पहाट नव्याच  दिवसाची.

   तुम्हीही पहा स्वप्न आशेने
   ती पहाट उगवण्याचे
   लाभेल तुम्हाला बघा निष्ठेने
   फळ तुमच्या संयमाचे .  
 
                 किरण क्षीरसागर  


Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: निष्ठा ..... किरण क्षीरसागर

naamagumjaayegaa
good one.