झाल न परत तेच?...

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

झाल न परत तेच?...

तनवीर सिद्दिकी
'बॉम्ब' बे....!!!
झाल न परत तेच?...
.
'कोणीतरी' आलं..ठिणगी मारून गेल...!!!!
कोण आलं?..- 'माहित नाही'
कोण मेलं?..- (तेही माहित नाही....!!!!)
.
.
आपल्यासारखेच काही त्यात गंडले..
थोडे जण घाबरले..थोडे भांडले..
मथळे निघाले..काही लेख सांडले..
५-५० जहाल-तिखट तत्वज्ञान मांडले..
बस..संपल..खतम ....
..
परत तेच..
आपण 'हतबल'....परत तेच बोलायला तयार......
.
''मी काय करणार?..........असो............आपलं पांघरून घे..''
''कोणी मदत मागतंय?....अरेरे थांब.......आधी 'नाव' विचारून घे..''
''आपलं भागतंय ना?........मरो दुनिया....दार लावून घे..''
''संपल का पुराण तुझ?.....चल रे ...........टाळ्या वाजवून घे..''
...
हीच आपली ताकद...बस...
.
किती मयत पडल्या...
किती पापण्या रडल्या..
आपण चालत राहायचं तुडवत सर्व..
आयचा घो....'स्पिरीट म्हणे..च्यायला...!!!'
..
आणि नंतर ढकलायचं फक्त...
नावडत्या नेत्यावर....
भ्रष्टाचारी पोत्यावर....
परदेशी उंदरांवर......
शासकीय मेंढरावर...
बस..बस..असंच...आता कसं....!!!! ....
.
तुमच काय चूक म्हणा....देशाचा कायदाच आहे तसा...
'माणूस मारण्याची परवानगी आहे इथे ...(कसाब) कुत्रे मारण्याची नाही..
फक्त धरून आणायचे..
थोड मारायचं...सोडून द्यायचं...
.
पण खर सांगू?..
याला म्हणतात....
'अंधेसे तशरीफ़ पिटवाओ और फिर घर तक भी छोडके आओ.....
..
असो..
आपल्याला काय?...
..
जाता जाता सांगतो...
पण पु.लं. च एक निरीक्षण फार खर होत..
साधसच..पण अगदी खर..ट्रकवर पाहिलेलं..
लिहील होत..
..
''भारत देश महान....आणि पुढे......HIGHLY INFLAMMABLE...."
..
भे#@$% एक माणूस नाही भेटला आजपर्यंत छातीठोक सांगणारा..
यातलं दोघातल कुठल वाक्य खर आहे ते.....!!!!!

..
तुम्हांला तरी माहितीये का?....
का तेच परत ?....
.
संपल का पुराण तुझ?.....चल रे ...........टाळ्या वाजवून घे..
असू द्या...असू द्या....
भावना पोहोचल्या...
(च्या मारी)....


तनवीर सिद्दिकी.