सुख आहे आज तरिही..

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सुख आहे आज तरिही..

sruja

आठवतात मज त्या भयाण राती
काळोखाचे कल्लोळ माजवणाऱ्या
गडगडाटी त्या अखंड धारा
तांडवनृत्याने नभ गाजवणाऱ्या

आठवतात मज ते दिनही भीषण
काळवणव्यात विद्रूप रापलेले
ग्रहणाने मळभे काळे नभ
काळ्याच रक्ताने जसे माखलेले

आठवते ती कातर संध्याही
अंत तिचा तसा करूण
अखंड जळणारे प्रेत तिचे
आकांक्षांचे अन स्वप्नांचे तरूण

आठवते उषा सुद्धा आज
रात्रीच्या भयाने गोठून बसलेली..
पानपापणी सुद्धा हरेक
विश्वात नसून नरकात नासलेली

आठवतं सगळं जसं भयाण
तुझा स्पर्श सुद्धा रे मला आठवतो
दुःखाच्या वादळातला मला
तुझा श्वास अजून जाणवतो

सुख आहे आज तरिही
तुझा तो हळूवार स्पर्श नाही
ना किरणांचे भांडार आहे
ना उद्याची इच्छा काही..

सुख आहे आज तरिही
तुझ्या मिठीत विरघळणं नाही
स्वतःकडून तुझ्यात पळणं नाही
तुझ्या असण्याने मी उजळणं नाही..

सुख आहे आज तरिही
जर दुःख म्हणजे तू असणं
असं जर असेल समीकरण
तर मी आजही तयार आहे
तुझी समिधा व्हायला...

सृजा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुख आहे आज तरिही..

naamagumjaayegaa
bhiDaNaaree kavitaa. kholwarachaa arth.