तुझ्या सावलीला उन्हाचे किनारे

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तुझ्या सावलीला उन्हाचे किनारे

Gajanan mule
तुझ्या सावलीला उन्हाचे किनारे
तुझ्या पावलांना दिशांचे पहारे

माझ्या उशाला हात स्वतःचे
तुझ्या उशाला स्वप्न उद्याचे

आभाळ दाटे अवचित कधीही
कुणाची तमा कुणालाच नाही

कशा सांजवेळी उठतात ज्वाला
अन् पायाशी उडे..पडे झाडपाला

निखाऱ्यात ठिणगी निपचित निजली
हळूहळू  तीही नकळताच विझली

आता आठवांचे कढ फक्त उरी
रित्या रिकाम्या या माझ्याच दारी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तुझ्या सावलीला उन्हाचे किनारे

naamagumjaayegaa
खुप छान आहे. हिच्या पहिल्या दोन ओळी तर केवळ सुंदर. नंतरच्या शेरांचा आशयही आवडला. परंतु एकदा लगागालगागालगागालगागा हे वृत्त (भुजंगप्रयात का?) घेतले तर ते शेवटपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. किंचित बदल करून ही एक सुंदर गेय कविता बनेल.