- तुझ्याचसाठी -

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

- तुझ्याचसाठी -

भारती सरमळकर
तुझ्याचसाठी सजली रे, आज तुझी ही सखी
साज श्रुंगार करु कसा, आणि किती किती
.
रात्रीकडूनी आज चॊरीले, थॊडेसे हे काजळ
नयनांमध्ये भरता मी ते, चाहुल देई वादळ
.
चमचम चांदण अल्हडसे ते, लेऊनी देहावरती
ऊब लागता तुझ्या कवेची, नकळत सांडुन जाती
.
चंद्र नभीचा चोरुनी मी रे, ल्याले भाळावरती
तू मग सामोरी असताना, त्याची मादकता फिकी
.
केशसंभार बसले करुनी, माळुनी मोगरा वेणी
अलगद सुटता काटा मग, तू नकळत अडकून जाशी
.
नथीत माझ्या लखलख मॊती, बसली नाकामधी
आतुरली ती माझ्या संगे, तुज अधराच्या स्पर्शासाठी
.
खणखणत्या ह्या चुड्यात राया, तुझीच प्रिती भरली
वाराही बेधुंद होऊनी, छेडुनी मजला जाई
.
छुमछुम पैंजण बांधून पायी, वाट पाहते तुझी
आरसा ही मग हेवा करीतॊ, पाहूनी तुझी ही सखी
-
भारती सरमळकर