गदगद

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

गदगद

मार्गस्थ उषेचा (भूषण महाजन)

माझे गढूळ काळीज,
रात गळते एकाकी.
चांद ओल्या त्या डोळ्यात
कशी जळते लकाकी.

वाट पाउल पाउल
देतो मृदुगंध हुल
नाद करतो पिंपळ
नाही पहावे चकाकी.

साद घालतो किनारा
लाटांसंगे जगे वारा
धडधड ही दिशेला
फ़डफ़ड ती पताकी!

झाली घरामधे धुळं
घे गं आवरून आई
आज आडोशी ढगाला
किती गदगद होई.


-भुराम
१६-०४-२०१२
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: गदगद

सचिन काकडे
झाली घरामधे धुळं
घे गं आवरून आई
आज आडोशी ढगाला
किती गदगद होई.

Terrific......
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: गदगद

भारती सरमळकर
In reply to this post by मार्गस्थ उषेचा (भूषण महाजन)
अप्रतिम !