तहान..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तहान..

सृजा
उन्हाच्या कपाळी ओगळलेले
घामाचे थेंब दोन चुकार
मिटता मिटता घरघरते
डोळे तिचे कधीचे लाचार

वाट पाहते त्याची अनंता
येण्याची काही योजना नाही
थकलेल्या आसवातून ओलांडलेली
कुठली पायरी कल्पना नाही

थांबला आहे श्वास तिचा
क्षणभर स्वप्नं पाहण्यासाठी
थांबली आहे माती सुद्धा
कण्भर साठून राहण्यासाठी

व्यक्त होण्याच्या गरजा तिच्या
अव्यक्त आसवात मिटल्या
हुंदक्यात लपेटलेल्या भावना
अबोल स्पर्शात दाटल्या..

सृजा