---- खैरात ----

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

---- खैरात ----

संदीप पाटिल
पाहतो मी आज काळोखात आहे ..!
आंधळाही हेच गाणे गात आहे..!

मी दिव्यांची कोणती आरास मांडू ,
झेलण्याला चंद्र आता जात आहे .!

लडबडीने चालणे जमले न मजला ,
घेतला जो घोट तो पोटात आहे .!

ऐक म्हणतो ही त्सुनामी संगीताची ,
ती मधुरता याच आवाजात आहे .!

प्रश्न माझा मांडला मी त्या तिथेही ,
अन खुलासे या इथे डौलात आहे .!

ह्या दलालांनी मला वेडे समजले ,
हे कसे वेडेच बाजारात आहे .!

प्रेम केले मी तुझ्यावर गझल वेडे ,
तू तशी स्वप्नात अन ओठात आहे .!

चाहणारे लोक सारे गझल माझी ,
ऐकणारे या महाराष्ट्रात आहे .!

ओळखीची वाटली जेव्हा मला तू ,
काय सांगू मी किती प्रेमात आहे .!

(पंख फुटले या चिड्यांच्या पाखरांना ,
पाखरांची झेप ही गगनात आहे .!)

एकट्याचे झाड माझे लावतो मी,
पेटले जंगल जरी वणव्यात आहे .

( जो मिळाला भाव आता कापसाला ,
तो नको मिळवायचा कांद्यात आहे .!)

दे भविष्या वर्तमानाची निशाणी ,
चालला भुतकाळ अंधारात आहे .!

या मनाची कैफियत मांडू कशी मी ?
वाटलेली ही जुनी खैरात आहे ...!

ज्ञानदीप सागर ...