---- मी ही डोंगर ----

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

---- मी ही डोंगर ----

संदीप पाटिल
होतो तेव्हा मी ही डोंगर ...!
जेव्हा होते खाली अंबर ..!

माझ्या साठी काडेपेटी ,
म्हाता~याची काठी सुंदर ..!

इकडे तिकडे आहे कचरा ,
मी आवरतो तू पण आवर ..!

कोठे आहे देव तुझा रे ,
भैय्या म्हणतो मेरे अंदर..!

नाती गोती जात कुणाची ,
माणूस होता आधी बंदर ..!

देव तुझा तो कोठे आहे ?
धरतो मी मग माझे कंबर ..!

कोड्यांचे हे गणितच भारी ,
सोडव तेही मग संविस्तर ..!

प्रेमा पासुन वंचित झालो ,
आठवते मग ते पण नंतर..!

मिरची मिरची पेरीत सुटलो ,
झाली त्याची नंतर साखर ..!

गाणे गातो मी बिजलीचे ,
पडते तेव्हा होतो बेघर ..!

वाटा शोधात फिरतो जेव्हा ,
उतरून येतो मी रस्त्यावर ..!

जगणे म्हणजे भूक मनाची ,
कविता होते त्याची भाकर !

नियतीचा हा नकार आहे ,
ठेच नव्हे ती आहे ठोकर !

मृत्यू म्हणजे सुटलो आता ,
जगणे झाले जे गत्यंतर ..!

ज्ञानदीप सागर ..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ---- मी ही डोंगर ----

सचिन काकडे
Top!!! Top !!! Top !!! एकदम हीट कविता
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ---- मी ही डोंगर ----

भारती सरमळकर
In reply to this post by संदीप पाटिल
वाह अप्रतिम कविता !
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ---- मी ही डोंगर ----

प्राजक्त
In reply to this post by संदीप पाटिल
मस्त रे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ---- मी ही डोंगर ----

मनिषा नाईक (माऊ)
In reply to this post by संदीप पाटिल
क्या बात मस्तच