आठवण माझी झाल्यावर

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आठवण माझी झाल्यावर

manisha bangar-belge


बघ वळून कधी मागे , आठवण माझी  झाल्यावर
तुझ्याच मागे सावली उभी असेल, माझी उन ही गेल्यावर
बघ हसून कधी, आठवण माझी झाल्यावर  
खळाळणारे हसू ,माझेच असेल तुझ्या ओठांवर  
बघ चालून दोन पावले, माझ्या दिशेने कधी आठवण माझी झाल्यावर
हात माझे  उधळीत असेल  फुले,  तुझ्या प्रत्येक पावलांवर
                                 मनिषा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण माझी झाल्यावर

manish
आता संपलयं ते सारं....
आता संपलयं ते भास होणे,तू नसल्याठिकाणी तुला पहाणे,
तू समोर असल्यावर,स्वतःलाच विसरून जाणे.....
आता संपलयं ते सारं....
आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,तू बोलत असताना माझे गप्प होणे,
आणि,तुला एकटक बघत रहाणे....
आता संपलयं ते सारं....
आता संपलीयेत ती भांडणे,शुल्लक गोष्टीवरून रूसणे,
थोडा वेळ अबोला धरणे,आणि, नंतर मीच ..
sorry sorry sorry म्हणणे...
आता संपलयं ते सारं....
आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,तुला आठवून माझे हळवे होणे,
रात्रभर एकच गाणे ऐकणे,आणि, कधी,
हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,
आता संपलयं ते सारं...