आपले मला म्हणशील का?

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आपले मला म्हणशील का?

Shahin
आपले  मला  म्हणशील  का?

स्वप्नांच्या  वाळवंटात  पाऊस  होऊन  येशील  का ?
झालेल्या  त्या  घावांवर  फुंकर  तू  मारशील  का ?

माझे  नसून  कोणीच  सर्वस्व  तू होशील का ?
प्रेमाचा तो  गोड अनुभव  देऊन  मजला  जाशील  का ?

रोजच  येतात  अश्रू  त्यांना  तळहातात भरशील  का ?
नाहीच दिला आनंद तरी  सुखस्वप्नांची ग्वाही देशील का ?

मीच  आहे  दूरवर साथी  तू  माझा  होशील  का ?
एकटीच  चालणार  असले  तरी  तुझा फक्त  भास  देशील  का ?

तुझीच  छाया  बनून राहीन   सूर्य  तू  माझा  होशील  का ?
तुझ्यासाठी  जळेन  मी  प्रकाश   मजला  देशील  का ?

आपले  सगळे  असले  तरीही  तू  सर्वात  खास  होशील  का ?
एकच  असतो  जीव  देण्यासारखा  त्याचा  हक्क  तू  घेशील  का

मनातले  भाव  माझे  ओळखून  तू  घेशील  का?
डोळ्यांने  बोलेन  मी  भाषा  ती  समजून  घेशील  का?

माझ्यात  नसेल  ताक़द  तरी  हिम्मत  माझी  होशील  का ?
जगाच्या  पुढे जाईन मी  असे  प्रेम  मला  देशील  का ?

असेन थोडी  भोळी  रागीट समजून  मला  घेशील  का ?
जे  आजवर  न  जमले  कोणाला  जमवून  तू  घेशील  का ?

तुझ्या  आठवणीवर  जगण्यास  मला  शिकवशील  का ?
दूर  गेलास  तरी  जवळ  नेहमी  राहशील  का?

स्वच्छंद  उडेल  जे  सागरावर ते  प्रेमपाखरू  होशील  का ?
ज्याची वाट पाहते  मी  नेहमी  तो  वाटसरू तू  होशील  का ?

दगडाच्या  या  काळजाला  पाझर  आता  फोडशील का?
तुझ्याकडे  येणारा  हाथ  ओढून  आता  घेशील  का?

डोळे  हे  निरागस  स्वप्न  यात  भरशील  का ?
तुझीच  आहे  मी  आता  तू  माझा  होशील  का ?

तुझा  हा  अबोला सांग आता संपवशील  का ?
थकले आयुष्यापासून जगण्याची उमेद  देशील का ?

सांग  माझ्या  प्रितसाजणा  “आपले  मला  म्हणशील  का ?”