शाळा

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शाळा

Gajanan Mule
शाळा

तो पहिला पाऊस ... ती रंगीत छत्री
भरलेलं दप्तर ... आदल्याच रात्री
हातात धरलेलं दादाचं बोट
फुलपाखरांनी भरलेलं आपलं पोट
बाईंनी घेतलेला मुका दिलेली कळी
जिभेवर विरघळलेली पेपर्मेंटची गोळी
गच्च मुठीत धरलेलं ते रूपयाचं नाणं
नव्या नव्या वहीची ती नवीकोरी पानं
नव्याकोऱ्या पुस्तकांचा घेतलेला वास
चालू वर्गातच सोडलेला उपवास
नवे नवे कपडे नवे नवे श्यूज
नव्या पुस्तकातलं नवंच गुज
नव्या ड्रेसवर पडलेला शाईचा डाग
नव्या नव्या मित्राचा आलेला राग
ती मधली सुट्टी तो गोपाळकाला
ते सोडावाटर ते बरफ का गोला
काढलेला चिमटा केलेल्या चुका
आठवीच्या अभंगातून भेटलेला तुका
लागलेली छडी ... उठलेला वळ
अक्षरांतून मिळालेलं जगण्याचं बळ
ते सहा दुणे बारा ते बार दुनी चोवीस
ते पिंपळाचं पान ते मोराचं पीस
ती वाजणारी घंटा ... भरणारी शाळा
स्वप्नात येणारा वर्गातला फळा
ती ठोकलेली धूम ते उडालेलं पाणी
रेंगाळत राहिलेली पुस्तकातली गाणी


आता सुटलेली शाळा , फुटलेली पाटी
उरलेलं दप्तर ...... विरलेली दाटी

- गजानन मुळे
- Mulegajanan57@gmail.com
Gajanan Mule
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शाळा

Siddheshwar Vilas Patankar
तुमच्या कविता एकदम वाखाणण्याजोग्या आहेत . उडत गेलं जर कोण विचारत नसेल तर . तुम्ही लिखाण चालू ठेवा तुम्हाला या ऐसाहीत्याच्या कट्ट्याची शप्पथ आहे .

सुंदर कविता झाली आहे. एकदम शाळा समोर उभी राहिली अन डोळ्यात पाणी आलं .

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शाळा

विजया केळकर
 शाळा सुटली  पाटी फुटली
     आई  मला भूक लागली  .....
या कवितेची आठवण झाली .
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शाळा

Gajanan Mule
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद .. माझे लिहिणे चालूच आहे.... फक्त इथे लिहित नाही....आता हि पोस्टही सापडत हि नाही...


आपल्या शुभेच्छा शिरोधार्य

2016-11-05 11:24 GMT+05:30 Siddheshwar Vilas Patankar [via ई-साहित्य] <[hidden email]>:
तुमच्या कविता एकदम वाखाणण्याजोग्या आहेत . उडत गेलं जर कोण विचारत नसेल तर . तुम्ही लिखाण चालू ठेवा तुम्हाला या ऐसाहीत्याच्या कट्ट्याची शप्पथ आहे .

सुंदर कविता झाली आहे. एकदम शाळा समोर उभी राहिली अन डोळ्यात पाणी आलं .

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलासIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp3755726p4641951.html
To unsubscribe from शाळा, click here.
NAML--
Gajanan Mule
Gajanan Mule
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शाळा

Hemantkumar Bhoye
In reply to this post by Gajanan Mule
Ekdam chhan...Zakkas kavita...asech lihit raha...Waaaaa...Man Trupt Zale...
                                                                                                       ---HK...